पनवेलमध्ये वाघ; ही अफवाच! नागरिकांनी भीती बाळगू नये; वनविभागाचे आवाहन

पनवेल : बातमीदार

पनवेलजवळील नांदगाव येथील पेट्रोल पंपावर 28 जुलैच्या रात्री दोन बिबटे वाघ आढळून आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झाला. त्यानंतर याची दखल वृत्तवाहिन्यांनी घेतल्याने नांदगावसह पनवेल तालुका भयभीत झाला, मात्र याबाबत वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर सदरचा व्हिडीओ हा अन्य कोणत्या तरी अज्ञात ठिकाणाचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पनवेल वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) ज्ञानेश्वर सोनावणे यांनी नागरिकांनी भयभीत होऊ नये म्हणून आवाहन केले आहे, तसेच सदरची माहिती ही खोटी असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत तालुक्यातील नांदगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाचे मालक कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरचा व्हिडीओ हा आपल्या पेट्रोल पंपातील नसून अन्य दुसर्‍या जागेतील आहे, तसेच पनवेलमध्ये गेला आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू असून या चित्रफितीमध्ये पेट्रोल पंपाची जागा ही पूर्ण सुकलेली म्हणजे उन्हाळ्यातील वातारवण दर्शवित आहे. महत्त्वाचे म्हणजे आमचा पेट्रोल पंप 24 तास सुरू असतो. त्यामुळे याबाबत आमच्याकडे असणार्‍या कामगारांनासुद्धा तो दिसला असता, मात्र तसा तो दिसला नसल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या वेळी आम्हाला ही बातमी कळली त्या वेळी आम्ही संपूर्ण स्टाफला सोबत घेऊन घटनास्थळावर गेलो. त्या वेळी तेथील कामगारांसह त्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता असा कोणताही प्रकार पनवेल तालुक्यात घडलेला समोर आलेला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणतीही भीती बाळगू नये.

-ज्ञानेश्वर सोनावणे, वनविभाग, पनवेल

आमच्याकडे असा कोणताही प्रकार घडलेला नाही, आमचे कामगार 24 तास या ठिकाणी आळीपाळीने हजर असतात, तसेच बाहेरून हायवे रस्ता असल्यामुळे या ठिकाणी दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे हा व्हायरल झालेला व्हिडीओ अन्य कुठलातरी असावा.

-विनय खुटले, व्यवस्थापक, रिलायन्स पेट्रोल पंप

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply