Breaking News

नोकरीच्या अमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक

पनवेल : बातमीदार

मंत्रालयात नोकरीला लावतो, असे सांगून एका 30 वर्षीय इसमाची साडेआठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिंक्य प्रवीण शेडगे (रा. नंदनवन कम्प्लेक्स, पनवेल) हे एचपी गॅस अंबरनाथ येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांचे नातेवाईक प्रकाश बाळाराम आष्ट़मकर (रा. झिराड, ता. अलिबाग) यांनी त्यांचे मित्र सागर कृष्णा भगत (रा. अलिबाग कोळीवाडा) हे मंत्रालयात चांगल्या पदावर नोकरीस असल्याचे सांगून, सप्टेंबर 2015 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सागर भगत व प्रकाश आष्ट़मकर हे अजिंक्य याला पनवेल एसटी स्टॅण्ड येथे भेटले. त्या वेळी सागर भगत यांनी मंत्रालयात लिपिकाच्या जागा भरावयाच्या आहेत व त्या नोकरीकरिता आठ लाख रुपये व शिपायाच्या नोकरीकरिता चार लाख रुपये खर्च येईल, असे अजिंक्य याला सांगितले होते. त्यानुसार त्यांना अजिंक्य याने एकूण साडेआठ लाख रुपये दिले. नोकरीबाबतच्या त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची शहानिशा केली असता, सदरची कागदपत्रे ही खोटी असल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी अजिंक्य याने पैशांची मागणी केली असता त्यांनी काही दिवसात सर्व पैसे परत करतो, असे सांगितले, मात्र पैसे परत दिलेले नाहीत. त्यामुळे मंत्रालयात नोकरी न लावता, नोकरी लावण्याकरिता साडेआठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply