Breaking News

गव्हाण विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

गव्हाण : रामप्रहर वृत्त  – येथील ‘रयत शिक्षण संस्थे’च्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विश्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच लो. टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने इयत्ता 9वी ‘ब’ या वर्गाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्या साधना डोईफोडे यांनी भूषविले. कु. मरियम अन्सारी व अबुअदान शेख (हिंदी) या विद्यार्थ्यांची, तसेच मराठी भाषा शिक्षक चंद्रकांत पाटील आदींची या वेळी भाषणे झाली. कार्यक्रमाला विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, रयत को-ऑप. बँकेचे संचालक प्रमोद कोळी, ज्यु. कॉलेज विभागप्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे, प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, इ. 9वी ‘ब’च्या वर्गशिक्षका वाय. एस. पाटील, तसेच रयतसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. सानिका देशमुख हिने केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply