पनवेल ः रामप्रहर वृत्त – गेली अनेक दशके निःस्वार्थपणे कुष्ठरोग्यांची सेवा करणारेे ज्येष्ठ समाजसेवक कुष्ठमित्र अविनाश म्हात्रे यांचा नुकताच लोकहिंद गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त लोकप्रिय असलेल्या लोकहिंद न्यूज चॅनल आणि शिवमार्ग न्यूज चॅनल यांच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना लोकहिंद गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीचा बाबा आमटे रुग्ण मित्र लोकहिंद गौरव पुरस्कार अविनाश म्हात्रे यांना माजी जिल्हा अध्यक्षा मंजुषा जाधव, जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती वैशाली चंदे, समाजकल्याण सभापती संगीता गांगड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी माजी सभापती सुभाष हरड, आदिवासी प्रकल्प अधिकारी अशोक इरणक, काशिनाथ तिवरे, दिलीप धानके, आयुक्त मधुकर फर्डे, ब्रह्मकुमारी पुनमदिदी आदी मान्यवर उपस्थित होते.