उरण : रामप्रहर वृत्त
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/08/bct-college-dronagiri-2-1024x576.jpg)
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
बीसीटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 17 वर्षांखालील मुलांच्या गटात आणि 14 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव तालुक्यात झळकावले. याबद्धल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक किशोर गाताडी व मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांचे स्कूल कमिटीचे सदस्य व चेअरमन प्रतिनिधी यांनी अभिनंदन केले, तसेच पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.