कर्जत : बातमीदार
शहरातील रोजंदारी कामगारांची नोंदणी करण्यासाठी आरपीआय (आठवले गट), उन्नती फाउंडेशन व कॉमन सर्विस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमध्ये नुकताच ई श्रमकार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 159 जणांची नोंदणी करण्यात आली. कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राहुल डाळिंबकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी आरपीआयचे कोकण नेते मारुती गायकवाड, शहराध्यक्ष अरविंद मोरे, कार्यध्यक्ष सुनील काळे, तालुका कार्याध्यक्ष भगवान जाधव, माजी सचिव किशोर जाधव, मनोज गायकवाड, सुनील सोनावणे, संतोष जाधव, राहुल गायकवाड, माजी नगरसेवक दिपक मोरे, बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हा अध्यक्ष उत्तम गायकवाड, किशोर गायकवाड, राजू चव्हाण, अलोक डाळिंबकर, मनोज निकम, नाना जाधव, गौतमी उघाडे, संदीप नेत्रगावकर, गणेश भोर्घे, शंकर तलावडे, सुमित गायकवाड, सुदर्शन निकम उपस्थित होते.