नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश सीताराम पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मंडल चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पनवेल विभागातील भाजपचे कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील सर्व नेते व कार्यालय यांच्याशी सातत्याने समन्वय साधून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याची अपेक्षा भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत यांनी दिलेल्या नियुक्तिपत्रात व्यक्त केली आहे. निवडीमुळे रमेश पाटील यांचे भाजपसह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.