Breaking News

कर्जत-लोणावळादरम्यान दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात

कर्जत ः बातमीदार

जुलै महिन्यात कर्जत-लोणावळा मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मेन लाइनवरील दक्षिण-मध्य मार्गावर वाहतूक थांबवून दुरुस्तीची कामे केली जात आहेत.दरम्यान, मध्य रेल्वेच्या या कामांमुळे बोरघाट अधिक सुरक्षित होत असून त्या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे मुंबई येथील वरिष्ठ अधिकारीवर्गाने केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी सर्व परिस्थिती पाहून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. बोरघाटात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्याआधी कर्जत-लोणावळादरम्यान घाटामध्ये मालगाडी घसरल्याने मेन लाइनवरील कर्जत-लोणावळादरम्यान सेवा खंडित झाली होती. या वर्षी सातत्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक खंडित होण्याची परंपरा लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने 28 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या काळात काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या चालविल्या जात असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले जात आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply