उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जासई येथील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 7) घडली. शिवानी अरुण म्हात्रे (20) असे या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, इयत्ता बारावीत शिकत असलेल्या शिवानी म्हात्रे हिने शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि तरुणीचे पार्थिव विच्छेदनासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तरुणीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी उरण पोलीस ठाणे अंतर्गत जासई दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक ए. आर. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.