Breaking News

परप्रांतीयांचा पुन्हा परतीचा प्रवास

नागपूर ः प्रतिनिधी

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा मजुरांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. हे स्थलांतर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये होऊ लागले आहे. मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये येणार्‍या व जाणार्‍या बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या बसस्टॅण्डवर मध्य प्रदेशमध्ये जाणार्‍या बसेससाठी मजुरांनी रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. भारतात लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर देशाने पाहिले आहे. वांद्रे स्थानकाबाहेर शेकडोंच्या संख्येने जमा झालेले परप्रांतीय मजूर व त्यांना पांगवण्यासाठी झालेला लाठीमार ही दृश्यही सगळ्यांनी पाहिली. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. मध्य प्रदेश सरकारने 20 मार्चपासून 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे जाणार्‍या व मध्य प्रदेशमधून महाराष्ट्राकडे येणार्‍या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मागील वेळेप्रमाणेच यंदाही बससेवा दीर्घकाळ खंडित राहण्याची भीती नागपूर बसस्टॅण्डवर जमलेल्या मजुरांमध्ये दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यानच्या प्रवासी बसेस बंद होण्याबद्दल आम्हाला समजले आहे. त्यामुळेच आम्ही आज परत जात आहोत, अशी प्रतिक्रिया मजूर व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यात सुमारे 74 हजार रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारने राज्यात निर्बंध जाहीर केले आहेत. तसेच लोकांनी निर्बंध पाळले नाहीत, तर नाईलाजाने लॉकडाऊनचा शेवटचा पर्याय निवडावा लागेल, असा जाहीर इशारा देण्यात आला आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या हा आरोग्य प्रशासन आणि सरकारसाठीही चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply