जनतेची कामे सहज होणार -महेश बालदी
पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या रसायनी मोहोपाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. विभागात झालेल्या या कार्यालयामुळे जनतेची कामे सहज होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उरण मतदारसंघातून महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळवून दिले. जनतेची सेवा आणि त्यांची कामे जलदगतीने व्हावीत, उरण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी महेश बालदी यांनी पुढाकार घेतला आहे. रसायनी मोहोपाडा परिसरातील नागरिकांसाठी सर्वसुविधांयुक्त अद्ययावत सार्वजनिक रुग्णालय, नगरपंचायत, धरणांतून पाणी योजना, रस्ते, रोजगार व इतर प्राथमिक सुविधा मिळवून देण्याचा निश्चय महेश बालदी यांनी केला आहे. त्या अनुषंगाने मोहोपाडा येथे उभारण्यात आलेले कार्यालय जनतेच्या सेवेसाठी उपयुक्त ठरणार आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, दिलीप पारंगे, प्रवीण खंडागळे, किरण माळी, ज्ञानेश्वर मुंढे, प्रवीण जांभळे, साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल, गुळसुंदे ग्रामपंचायत सरपंच हरिचंद्र बांडे, चौक जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष गणेश मुकादम, चांभार्ली पंचायत समिती विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय जांभळे, गणेश सावळे ग्रामपंचायत माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, प्रवीण जांभळे, प्रमोद कांबळे, अमित मांडे, मंदार गोपाळे, अनिल गीध, वामन धुळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.