Sunday , October 1 2023
Breaking News

राज्यात तापमानाचा पारा वाढला; यवतमाळात सर्वाधिक तापमान

पुणे ः प्रतिनिधी

राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता वातावरणही तापू लागले आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़  राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले गेले़.

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली़  कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे़, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़.

पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदिगड, जम्मू आणि काश्मीर येथे विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 12 ते 14 मार्चदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़.

  • राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान ः (अंश सेल्सिअस)- पुणे 36.6, लोहगाव 37.7, जळगाव 36, कोल्हापूर 36.8, महाबळेश्वर 32.3, मालेगाव 38.6, नाशिक 34.9, सांगली 37.8, सातारा 36.7, सोलापूर 38.9, मुंबई 31.2, सांताक्रूझ 32.6, अलिबाग 29.4, रत्नागिरी 33. 4, पणजी 32. 4, डहाणू 31.8, परभणी 38.4, नांदेड 38, बीड 38, अकोला 37.2, अमरावती37.2, बुलढाणा 32.1, ब्रम्हपुरी 38, चंद्रपूर 38.2, गोंदिया 33.4, नागपूर 38, वाशिम 38, वर्धा 38, यवतमाळ 39.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply