Breaking News

विकासाचे इंजिन जोमाने धावणार -आ. प्रशांत ठाकूर

माणगाव रेल्वेस्थानक सुशोभिकरणाचे भूमिपूजन

माणगाव  प्रतिनिधी
कोकणातील 12 रेल्वेस्थानकांच्या रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. या अनुषंगाने माणगाव रेल्वेस्थानकावर आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकार हातात हात घालून काम करीत असल्याने विकासाचे इंजिन जोमाने धावेल आणि कोकणातील पर्यटनामुळे उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
माणगाव रेल्वेस्थानकावर झालेल्या कार्यक्रमास भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रशांत शिंदे, भाजप प्रदेश सचिव रवी मुंढे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव, शिवसेना नेते अ‍ॅड. राजीव साबळे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार विकास गारुडकडर, माणगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जैन आदी उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनीही मार्गदर्शन केले. माणगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जैन यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक उपअभियंता श्रीकांत गणगणे यांनी केले.
कार्यक्रमास भाजप माणगाव तालुकाध्यक्ष उमेश साटम, शिवसेना तालुकाप्रमुख अ‍ॅड. महेंद्र मानकर, माजी सभापती संगीता बक्कम, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, युवा नेते निलेश थोरे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर, भाजप दक्षिण रायगड जिल्ह्याध्यक्ष हेमा मानकर, भाजप माणगाव शहर भाजप अध्यक्ष नितीन दसवते, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, सचिन बोंबले, रत्नाकर उभारे, दिलीप जाधव, पालीच्या माजी नगराध्यक्ष गीता पालरेचा, सामाजिक कार्यकर्ते संजय साबळे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष शेखर देखमुख, सरचिटणीस गोविंद कासार, युवराज मुंढे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय मोने, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, प्राजक्ता शुक्ला, अश्विनी खरे, निलम काळे, पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड, स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, माजी नगरसेवक नितीन वाढवळ, जयंत बोडेरे, युवा नेते सुमित काळे, परेश सांगळे, अच्युत तोंडलेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी यांच्यरासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply