Breaking News

गुळसुंदे येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपत

पनवेल : प्रतिनिधी

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन गुळसुंदे येथील शेकापच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी (दि. 10) भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

गजानन को-ऑप हौसिंग सोसायटी येथील नामदेव दगडू मांडवकर, हरी अंबू काईनकर, भालचंद्र अर्जुन नाईकनवरे, प्रकाश ईश्वर बडगेर, वाय. वाय. सुतार, रमेश वसंत वाघ, अनिल बाळू तांडेल,  वसंत जनार्दन शिगवण, राजेंद्र चिंतामण पवार यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला.

मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात त्यांचा भाजप नेते महेश बालदी यांच्या हस्ते शाल देऊन प्रवेश देण्यात आला. या वेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिचंद्र बांडे, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी माळी, माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, गुळसुंदे ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, महादेव कांबळे आदी उपस्थित होते.

एकेकाळी गुळसुंदे ग्रामपंचायतीवर राज्य करणार्‍या शेकापला दिवसेंदिवस गळती लागली आहे, त्यामुळे हा पक्षप्रवेश म्हणजे शेकापला आणखी एक दणका मानला जात आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply