उरण : प्रतिनिधी
चिरनेर प्रार्थमिक शाळेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा व पल्स पोलीओ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वच्छतेबाबत व लसिकरणाबाबत संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती धरले होते. संपूर्ण चिरनेर गावात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जनजागृती केली. या वेळी मुख्याध्यापक प्रवीण म्हात्रे व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
जिल्हा शाळा चिरनेरच्या वतीने पल्स पोलिओबाबत जनजागृती करण्यात आली. शाळेच्या शिक्षकांनी व पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मिळून स्वच्छता पंधरवडा साजरा करतानाच पोलिओ जनजागृतीही केली. या वेळी शाळेच्या पटांगणाची स्वच्छता करून गावात विद्यार्थ्यांची जागृती रॅली काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये ‘स्वच्छता पाळा रोगराईला पळवा’, ‘लस द्या बाळा स्वच्छता टाळा, दो बुंद जिंदगीके’, ‘जीवन आहे मोलाचे लस देणे गरजेचे’ अशी घोषवाक्य आसलेले फलक धरले होते, तसेच शिक्षक व विद्यार्थी घोषणाही देत होते.