पनवेल ः रामप्रहर वृत्त
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 12 वी (कला व वाणिज्य) शाखेच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी-शिक्षक व पालक मेळावा स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी मान्यवरांचे व पालकांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख पी. बी. पाटोळे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षेतील निकालाच्या अनुषंगाने अभ्यासाच्या प्रगतीचे विश्लेषण केले, तसेच अभ्यासाची नियोजन बरहुकूम केलेली कार्यवाही यामुळे गतवर्षीची उच्च निकालाची परंपरा या वर्षीही राखू, असा आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले. शिक्षक प्रतिनिधी प्रा. एम. के. घरत यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी स्थानिक शाळा समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णूके, प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. राजू खेडकर, प्रा. यू. डी. पाटील, प्रा. जे. ई. ठाकूर, प्रा. अर्चना पाटील, सर्व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागरकुमार रंधवे यांनी केले, तर प्रा. राजू खेडकर यांनी आभार मानले.