Breaking News

कळंबोलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन कळंबोली कातकरी वाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 20) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे माजी स्थायी सभापती व विद्यमान नगरसेवक अमर पाटील, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे, कामोठे उपाध्यक्ष प्रशांत रणवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत नाईक, मच्छिंद्र नाईक, अनिल नाईक, सीताराम नाईक, केशव नाईक, मंगेश नाईक, जनाबाई नाईक, कल्पना नाईक, तुलसीबाई नाईक आदी कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले.

Check Also

आशा सचदेव सत्तरीत, चित्रपटसृष्टीत पन्नाशी

आजच्या मल्टीप्लेक्स युगातील जेन झी पिढीला हिंदी चित्रपटसृष्टीतील आशा सचदेव नावाची अभिनेत्री माहीत असण्याची शक्यता …

Leave a Reply