पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती रयतच्या सर्व शाळा आणि महाविद्याल यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. वावंजे येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये जयंती सोहळा शुक्रवारी साजरा करण्यात आला. हा सोहळा रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. वावंजे येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यास शिवाजी विद्यालयाचे चेअरमन जी. आर. पाटील, महात्मा फुले महाविद्यायाचे प्राचार्य गणेश ठाकूर, परशुराम पवार, ज्युनियर कॉलेजचे पंकज पाटील, व्हाईस चेअरमन अब्दुलाही शेख, सरपंच डी. बी. म्हात्रे, विकास पाटील, सचिव ज्ञानेश्वर चोरमेकर, मच्छिंद्र पाटील, डॉ. संतोष जाधव, मुख्याध्यापक फडतरे, पर्यवेक्षक कारंडे आर. बी., मिनाक्षी श्रीवास्तव उपस्थित होते.