Breaking News

शरद पवारांनी माझा अनुभव घेतलेला नाही -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे, पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहर्‍यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो, हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली, तर कुणाला तरी बळीचा बकरा करायचा म्हणून आघाडीने मनसेला पाठिंबा दिला आहे, असा टोला लगावला.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply