पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांनी बुधवारी (दि. 20) सूत्रे स्वीकारली. ते यापूर्वी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम
पाहात होते.
या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, मावळते आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते. गणेश देशमुख यांची पनवेलमधून बदली करून त्यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात
आली आहेे.