पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वच स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे. पनवेल, उरण तालुका विभाग निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भातील पत्र संघटनेचे कार्याध्यक्ष व निवृत्त पोलीस उपनिरीक्षक जयंत पाटील यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे शुक्रवारी (दि. 11) सुपूर्द केले.
निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटना ही राज्यव्यापी असून नवी मुंबईतील पनवेल व उरण तालुका विभागातील संघटनेच्या 800 ते हजार परिवारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंबापत्र देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.