Breaking News

काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मदन कोळी यांनी शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत, भाजप नेते भीमसेन माळी, भाजपचे शहर सरचिटणीस अमरिश मोकल, जगदिश घरत आदी उपस्थित होते. मदन कोळी यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, शहर परिसरात भाजप अधिकाधिक मजबूत बनत चालला असल्याचे चित्र आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply