Wednesday , June 7 2023
Breaking News

पाकला पुन्हा झटका ; चॅनेलकडून ‘पीएसएल‘ ब्लॅकआऊट

मुंबई : प्रतिनिधी

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली असतानाच आता पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका बसला आहे. ’डी स्पोर्ट’ या क्रीडा वाहिनीने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सामन्यांचे भारतात प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाक क्रिकेटला चांगलाच दणका बसला आहे. आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग खेळली जाते. पीएसएलच्या प्रसारणाचे सर्व हक्क डी स्पोर्ट चॅनेलकडे आहेत. पीएसएलचे आधीचे दोन सीझन केवळ वेबवरच प्रसारित करण्यात आले होते. गेल्या वर्षीच डी स्पोर्टने या सुपर लीगच्या प्रसारणाचे हक्क मिळविले होते, पण पुलवामा येथील हल्ल्यानंतर डी स्पोर्टने सुपर लीगला भारतात ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय घेतल्याने पाक क्रिकेटला मोठा झटका बसला आहे. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाक खेळाडूंना खेळण्यास आधीच मनाई करण्यात आली आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply