Breaking News

माणगाव संगमेश्वर मंदिरात ‘त्रिपुरारी’

माणगाव : प्रतिनिधी

येथील श्री स्वयंभू संगमेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. 12)त्रिपुरारी पौर्णिमा भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी शिवशंकराची मनोभावे प्रार्थना केली. मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजयअण्णा साबळे व सर्व ट्रस्टी यांनी भक्तगणांचे स्वागत केले. मंगळवारी प्रसाद खरे, सचिन गोरेगांवकर, व सहाकार्‍यांनी मंदिराच्या गाभार्‍यात आकर्षक सजावट केली होती. श्री स्वयंभू संगमेश्वराचे पूजन झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता दिपोत्सव व महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील प्रसिध्द व्यापारी राजू पोरख यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली. या महाआरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मंदिर व परिसरात दिवे लावल्याने भक्तीमय व आल्हादायक वातावरण निर्माण झाले होते. मंदिर प्रवेशद्वाराजवळ दिव्या म्हशिळकर, दिपाली गोरेगांवकर, सिध्दी गोरेगांवकर, शिवानी नागावकर यांनी आकर्षक रांगोळी काढली होती. ती रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. देवस्थान  ट्रस्टचे अध्यक्ष संजयअण्णा साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ट्रस्टी, राम रातवडकर, सचिन गोरेगांवकर, दिनेश रातवडकर, कनोजे अण्णा, उमेश शेट, विजय मेथा, पुजारी हरेश जंगम, सचिन रातवडकर, प्रविण रातवडकर यांच्यासह संगमेश्वर नगरातील ग्रामस्थांनी हा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव यशस्वी करण्यासाठी विषेश परिश्रम घेतले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply