Breaking News

वीर वाजेकर कॉलेजचे अॅेथेलॅटिक्समध्ये सुयश

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन अ‍ॅथेलॅटिक्स स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. ही स्पर्धा मरीन लाईन्स येथील क्रीडा संकुलात झाली.

फुंडे महाविद्यालयातील अमृता महादेव पाटील या विद्यार्थिनीने हॅप्टेथॅलॉन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवित चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. लांब उडीत अमृता पाटील हिने रौप्यपदक प्राप्त केले. सौरव पाटीलने गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. कांदिवली (साई) येथे रिलायन्स युथ फाऊंडेशनने घेतलेल्या 100 मीटर हर्डल स्पर्धेत व लांब उडी स्पर्धेतही सौरवने कांस्यपदक प्राप्त केले.

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पी. जे. पाटील, कॉलेज विकास समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांना जिमखानाप्रमुख प्रा. डॉ. विलास महाले यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply