

पनवेल : भाजप नेते नामदेव पाटील आणि फुलाजी ठाकूर यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रवी जोशी, प्रकाश भगत, पुष्पा पाटील, लक्ष्मण पाटील, गुरू ठाकूर, कल्पेश ठाकूर, बिनदेश ठाकूर, उमेश मौर्य, भगवान सावंत आदी उपस्थित होते.
आशिष घरत यांचा वाढदिवस

उलवे नोडमधील युवा कार्यकर्ता आशिष घरत यांचे वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभीष्टचिंतन केले. या वेळी विभागीय अध्यक्ष विजय घरत, अनंता ठाकूर, किशोर पाटील, भाऊ भोईर, प्रसाद घरत, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
फिरोज सय्यद आणि निर्गुण कवळे यांचा वाढदिवस


पनवेल : भाजप अल्पसंख्याक मोर्चा नवीन पनवेलचे सरचिटणीस फिरोज सय्यद तसेच महाराष्ट्र राज्य नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप युवा मोर्चाचे साईचरन म्हात्रे उपस्थित होते.