Breaking News

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सव

नवीन पनवेल : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत मंगळवारी अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

आमदार महेश बालदी यांची सदिच्छा भेट

उरण ः येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी गीता पाठशाळेचे  प्रमुख  बी. के. विश्वास भाई यांनी नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, भाजप वाहतूक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

अरुणशेठ भगत यांच्या शुभेच्छा

युवा कार्यकर्ता आशिष घरत यांना वाढदिवसानिमित्त भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत वसंतशेठ पाटील, विजय घरत, सुधीर ठाकूर, भाऊ भोईर आदी.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply