Breaking News

देवीचापाडा येथे महिला सशक्तीकरण मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

देवीचापाडा येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देवीचापाडा शाखेत नाबार्ड व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आसपासच्या गावांतील बचत गटातील 25 महिला उपस्थित होत्या. या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी बँकेचे मॅनेजर आदेश मोहन ठाकूर, सहाय्यक स्टाफ  नम्रता नंदकुमार पाटील यांनी महिला सशक्तीकरणासाठी बँकेमार्फत बचत गटांना कोणत्या योजना दिल्या जातात यासंदर्भात मार्गदर्शन करून त्या विषयावर चर्चा करण्यात आली. याला बचत गटाच्या महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. बचत गटातील मीनाक्षी तांबडे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नेहमी प्रोत्साहन दिले जाते. महिलांना वेळोवेळी आर्थिक मदत या शाखेने दिली आहे. महिलांनी उद्योगाकडे वळण्यासाठी काय आवश्यक आहे, त्यांना लागणारे भांडवल, तसेच उद्योगधंदा सुरू करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना आहेत याचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. महिलांनी कधीही कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच मेहनत करून जगू शकतात. बचत गटाच्या महिलांचे सशक्तीकरण करणे हे आमचे महत्त्वाचे काम आहे, असे बँकेचे मॅनेजर आदेश ठाकूर यांनी सांगितले.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply