पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्रुप ग्रामपंचायत चिखले येथे झालेल्या सदस्यत्वाच्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्र. 3 सांगडे येथून सूर्यकांत गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे कुंडेवहाळ येथे सदस्य दिलीप धाऊ वासकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत ऋषिकेश दिलीप वासकर यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच ग्रुप ग्रामपंचायत चिखले व कुंडेवहाळ ग्रामस्थांनी दोन्ही सदस्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.