Breaking News

माणगावातील 23 गावे, 37 वाड्या तहानलेल्याच; पाण्यासाठी महिलांची वणवण

माणगाव : प्रतिनिधी 

दरवर्षीप्रमाणे यंदाही माणगाव तालुक्यातील गावांना मार्चपासूनच पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. तालुक्यातील 23 गावे व 37 वाड्यांतील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदाही त्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यातील सुरव तर्फे तळे, आमडोशी, चाच, बामणगाव, पळसफ मूळगाव, घोडेघुर्म, मालुस्ते, जोर, केळगण, मांजुरणे, जांभूळमाळ, कुंभार्ते, बोरमाळ, उमरोली, वडाचा कोंड, कविलवहाळ बुद्रुक, कविलवहाळ खुर्द, कविलवहाळ कोंड, उमरोली, दिवाळी, मांजरवणे, मुठवली तर्फे तळे, उसर बुद्रुक, उसरकोंड आदी गावे व उमरोली बौद्धवाडी, देगाव आदिवासीवाडी, पळसगाव खुर्द धनगरवाडी, कोंडेथर, हुंबरी धनगरवाडी, मशीद्वाडी, मशीद्वाडी बौद्धवाडी, कातळवाडी, उधळेकोंड, सोनारवाडी, वडाचीवाडी आदिवासीवाडी, पळसगाव बुद्रुक, धनगरवाडी, विहुलेकोंड, सांगी आदिवासीवाडी, महादपोली आदिवासीवाडी, कुंभेवाडी, कामतवाडी, मोरेवाडी, वडाचीवाडी, खर्डी बुद्रुक आदिवासीवाडी, चांदे आदिवासीवाडी, कुंभार्ते आदिवासीवाडी, कावडेवाडी, फणसवाडी, बागवाडी, कोस्ते बुद्रुक आदिवासीवाडी, गौळवाडी, निळज आदिवासीवाडी, उमरोली तर्फे दिवाळी बौद्धवाडी, आदिवासीवाडी, उमरोली तर्फे दिवाळी आदिवासीवाडी, उसर बुद्रुक बौद्धवाडी, रोहिदासवाडी, पळसगाव खुर्द आदिवासीवाडी, पळसगाव खुर्द धनगरवाडी, तळेगाव गोरेगाव आदिवासीवाडी या वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. माणगावातील 23 गावे व 37 वाड्यांना मार्चपासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असले तरी पुढील काळात तालुक्यातील आणखी काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या गावांना दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो, तसेच काही वाड्यांना बैलगाडीने पाणीपुरवठा केला जातो. माणगाव तालुक्याच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात वर्षानुवर्षे या गावांचा समावेश करण्यात येत असला तरी तेेथे पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी योजना का देण्यात येत नाहीत, हा प्रश्न ग्रामस्थांना अजूनही भेडसावत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply