Breaking News

क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू

मोहोपाडा : प्रतिनिधी

मैदानात चक्कर येऊन जमिनीवर कोसळलेल्या एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 24) खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे स्पर्धेदरम्यान घडली. अमर बाळाराम साळुंके (वय 22, रा. सावळे, ता. पनवेल) असे या खेळाडूचे नाव आहे

चांभार्ली येथील मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खेळताना सावळे येथील सावळेश्वर संघाचा गोलंदाज अमर साळुंके याला चक्कर येऊन तो कोसळला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अमरच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply