Breaking News

स्पेनने सहाव्यांदा जिंकला डेव्हिस चषक

माद्रिद : वृत्तसंस्था

राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा 2-0 असा पराभव केला.

अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अ‍ॅलिआसिमेचा 7-6 (7/3), 6-3 असा पराभव करून स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मग नदालने शापोव्हालोव्हला 6-3, 7-6 (9/7) असे पराभूत केले.

33 वर्षीय नदालसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले. त्याने फ्रेंच आणि अमेरिकन अशा दोन ग्रँडस्लॅम जेतेपदासहित जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे डेव्हिस विजेतेपदाने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्पेनने डेव्हिस चषक स्पर्धेत 2000, 2004, 2008, 2009, 2011, 2019 अशी सहा जेतेपदे पटकावली आहेत. नदालने स्पेनच्या चार (2004, 2009, 2011, 2019) डेव्हिस चषक विजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर रॉजर फेडररने स्वित्झर्लंडला फक्त 2014 मध्ये एकमेव डेव्हिस चषक जिंकून दिला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply