Breaking News

गृहनिर्माण योजना सोडतीतील सदनिकांचे सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वाटप

नवी मुुंबई ः सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळाच्या परवडणार्‍या 9,249 घरांची योजनेची सोडत दि. 26 नोव्हेंबर रोजी नेरुळच्या आगरी-कोळी संस्कृती भवन येथे काढण्यात आली होती. सदर गृहनिर्माण योजनेतील शिल्लक राहिलेली 991 घरे (सदनिका) प्रतीक्षा यादीतील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांसाठी घरे या उद्दिष्टांतर्गत सदर योजनेतील घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 3176 सदनिका व अल्प उत्पन्न घटकासाठी 6073 सदनिका नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यापैकी तळोजा येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील वेगवेगळ्या प्रवर्गातील एकूण 991 सदनिका शिल्लक राहिल्या होत्या.

सिडको संचालक मंडळातर्फे पारित करण्यात आलेल्या ठरावानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचे आरक्षण वगळता इतर प्रवर्गातील घरे शिल्लक राहिल्यास ही घरे सर्वसाधारण प्रवर्गांतर्गत वाटप करण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने सर्वसाधारण प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील विजेत्या ठरलेल्या अर्जदारांची यादी हीींिीं://श्रेीींंशीू.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply