नवी मुंबई : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून घणसोली येथे नव्याने झालेल्या सिडको प्रकल्पांतर्गत मालकंस गृहसंकुलात भारतीय जनता पार्टी, घणसोली विभाग आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली.
दरम्यान, या वृक्षारोपण कार्यक्रमात माझी सोसायटी माझी जबाबदारी या वाक्याचे ब्रीद वापरून सोसायटीच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी पाम, चाफा, जासवंद विविध प्रकारचे साधारण 25 वृक्षारोपन करण्यात आले. तर या वेळी सर्वांनी सोसायटीमध्ये फक्त रोपे लावली जाणार नाहीतर त्या रोपांची चांगल्याप्रकारे देखभाल, संगोपन करण्यासाठी सोसायट्यांमधील नागरिकांचे एक पाऊल पुढे असणार आहे. त्यासाठी सोसायटी प्रयत्नशील राहील, असे मत सोसायटीमधील नागरिकांनी व्यक्त केले.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी सोसायटीचे सभासद किरण शेडगे, चंद्रशेखर हेंडवे, संजोग येरुनकर, राकेश कांबळे, मयूर जाधव, सुरेश चिकणे, संदीप भिऊंगडे, रफीक अंसारी, गिरीश देसाई, हर्षद चव्हाण, सचिन तांडेल, शरद पालव, सुनील बोराडे, शंकर चव्हाण, शंकर धोंडे, गृहसंकुलाच्या गृहलक्ष्मी अर्चना शेडगे, माधुरी हेंडवे, शीतल भिऊंगडे, कोमल कांबळे, अन्वी येरुनकर, श्रेया पाटील तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.