पनवेल ः वार्ताहर
आधार संस्था सन 2006 पासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात एचआयव्ही आणि एड्स चे संक्रमण रोखण्यासाठी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्र संस्था यांचे प्रकल्प राबवत आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने रायगड औद्योगिक झोन व कंपनींमधील स्थलांतरित कामगारांचे तसेच वस्त्यांमधील अति जोखिमेतील लोकांसाठी मोफत एचआयव्ही टेस्टिंगचे कॅम्प आयोजित करणे, कॅम्प मध्ये एचआयव्ही निदान झालेल्या व्यक्तीस योग्य समुपदेशन करणे, एचआयव्ही वरील मोफत औषधोपचार सरकारी हॉस्पिटल मधून मिळवून देणे, एचआयव्ही संक्रमित व्यक्तींसाठी आधार गट चालवणे, एचआयव्ही बाधित व्यक्तींना समाजातून होणार्या कलंक आणि भेदभावासाठी वकिली करणे. तसेच मध्यवर्ती कारागृह तळोजा येथे एचआयव्ही एड्स जनजागृती करण्यासाठी आधार आणि लोकपरिषद पथनाट्य गटाने तळोजा जेल बाहेर पथनाट्याचे सादरीकरण केले. आगामी काळात सुद्धा संस्थेमार्फत जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.