Breaking News

‘इप्सित’ राज्य नाट्य स्पर्धेच्या फायनलमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळद्वारा इप्सित नाट्यसंघाच्या गोदो वन्स अगेन या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले असून, प्राथमिक पारितोषिक वाशीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्थेच्या शीमा या नाटकास मिळाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

गोदो वन्स अगेन या पहिल्याच नाटकाला घवघवीत यश प्राप्त झाले असून, वैभव अनंत महाडिक यांना दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. भगवान हिरे लिखित या नाटकाला संगीत कुणाल-करण यांनी दिले आहे, तर संगीत संयोजक राजेश (काका) परब आहेत. नेपथ्य सचिन गोताड, प्रकाशयोजना दशरथ कीर, रंगभूषा उदयराज तांगडी, वेशभूषा साहिल खाड्ये, अश्विन साळसकर, रंगमंच व्यवस्था अनिकेत पडवळ, राकेश मिरगल, मयुरेश पाटील यांनीही मोलाचे योगदान दिले आहे.

नाटकातील सर्व कलाकार कामोठे, खारघर, पनवेल चे असून, त्यांची नावे प्रवीण कुठार, अरुण पंडरकर, शेखर पगारे, नितीन पोचरिकर अशी आहेत. या नाट्यकृतीचे निर्मिती प्रमुख विद्याधर नामपल्ली, निर्मिती सूत्रधार प्रभाकर वारसे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह शामनाथ पुंडे आहेत, तसेच निर्मिती व्यवस्था वैभव यादव यांची आहे.

Check Also

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. …

Leave a Reply