Breaking News

पनवेलमध्ये ’हर घर दस्तक’अभियान कोरोना लसीकरणासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी ’हर घर दस्तक’ अभियानास सुरूवात करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने  9 ऑक्टोबरपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे.

पालिका क्षेत्रात मिशन कवच कुंडल अंतर्गत पहिल्या डोसचा लक्षांक पूर्ण झाला असला तरी केंद्र शासनाच्या ’हर घर दस्तक’ अभियानांतर्गत कोविड लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचारी पुनश्च: सर्वेक्षण करत आहेत. ज्या नागरिकांचा पहिला व दुसरा डोस  राहिला आहे अशा नागरिकांची नाव नोंदणी करून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे.

ग्रामीण भागातील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे अशा नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण भागात 30 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे. हे अभियान चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पहिल्या फळीतील कर्मचारी, आशा सेविका यांची मदत घेतली जात आहे. घरोघरी जाऊन लसीकरण झाले आहे की नाही याची नोंद करण्यात येत आहे.

कोविन पोर्टलच्या साह्याने ज्या लाभार्थींचा दुसरा डोस राहिला आहे अशा नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरणास प्रवृत्त केले जात आहे. बाजार पेठांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे.प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येत आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply