Breaking News

मुंबईच्या क्युसीएफआयची नवी मुंबई येथे बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ही गुणवत्ता क्षेत्रात विशेष कार्यरत असलेल्या संस्थेच्या मुंबई विभागाच्या कार्यकारीणीची बैठक नुकतीच नवी मुंबई येथील रामशेठ ठाकूर इंटर नॅशनल स्पोर्ट्स येथे झाली.

येत्या वर्षभरात मुंबई विभागाच्या वतीने विविध उपक्रमांची आखणी करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही बैठक संस्थेचे अध्यक्ष व संचालक के. बी. भारती यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. विविध संस्थांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी पडतील अशा उपक्रमांची आखणी करुन ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने चर्चा करुन आखणी करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीला स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सदस्यांचे स्वागत केले. दिवसभर चाललेल्या या बैठकीत महत्वाचे अनेक निर्णय घेण्यात आले. प्रथमच नवी मुंबईत आयोजित या बैठकीचे आयोजन करण्यासाठी राजेंद्र पोतदार आणि सपन बरदन यांनी विशेष परिश्रम घेतले.

या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या तसेच एम. एस. एम. इ. च्या कर्मचार्‍यांना विविध गुणवत्ता प्रणालींचे वेळोवेळी प्रशिक्षण देणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय वार्षिक अधिवेयानाचे आयोजन, शाळांच्या विकासासाठी विद्यार्थी व शिक्षकांना सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांद्वारे मार्गदर्शन करणे, इस्पितळातील रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी योजनला अंमलात आणणे, अशा अनेक महत्वांच्या विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.

या वेळी चिटणीस जयंत भालशे, एस. एस. पाटणकर, राजेंद्र पोतदार, सपन बरदन, एस. आर. पांडे, अमर मराठी, अरविंद कुलकर्णी, विजय लाड, हेन्री सॅम्युएल, गिरीश थत्ते, अरुण ताठरे आणि ठाणे जिल्हा उपविभागाचे विनया पै व महेश भोईर उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply