अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा रायगड जिल्ह्याचा निकाल 84.97 टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाचा निकाल घटला आहे. गेल्या वर्षी 86.87 टक्के निकाल लागला होता.
उत्तीर्ण होण्यात सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. 80.05 टक्के मुले, तर 90.63 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. माणगाव तालुक्याचा सर्वाधिक म्हणजेच 90.59 टक्के निकाल लागला असून, खालापूर तालुक्याचा सर्वांत कमी म्हणजे 73.69 टक्के निकाल लागला आहे. मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातूून 30 हजार 835 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 30 हजार 801 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यापैकी 26 हजार 173 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. शास्त्र शाखेचा 90.33 टक्के, कला शाखेचा 72.72 टक्के, वाणिज्य शाखेचा 89.28 टक्के, तर किमान कौशल्य शाखेचा निकाल 77.82 टक्के इतका लागला आहे. 14 हजार 338 मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील 12 हजार 994 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.63 टक्के आहे, तर 16 हजार 463 मुले परीक्षेला बसली होती. त्यातील 13 हजार 179 मुले
उत्तीर्ण झाली.
तालुकानिहाय निकाल
तालुका टक्के
पनवेल 88.78
उरण 82.23
कर्जत 85.15
खालापूर 73.69
सुधागड 83.91
पेण 85.11
अलिबाग 82.61
मुरूड 82.32
रोहा 80.47
माणगाव 90.59
तळा 78.57
श्रीवर्धन 85.71
म्हसळा 89.39
महाड 87.10
पोलादपूर 78.42