Breaking News

इंधन बचतीसाठी अलिबागकरांचे वॉकेथॉन

निरोगी आरोग्य, पर्यावरण हानी यासंदर्भात अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅली

अलिबाग : प्रतिनिधी : आपले आरोग्य निरोगी राहावे, पर्यावरण हानी थांबावी आणि इंधन बचत व्हावी यासाठी पायी चाला इंधन वाचवा असा संदेश देत आरोग्य पर्यावरण आणि इंधन वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी रविवारी (दि. 2) अलिबाग येथे रॅली आयोजीत करण्यात आली होती. ओएनजीसी आणि सुरभी स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजीत या रॅलीला ओएनजीसीचे अधिकारी व्ही. के. महेंद्रु यांनी हिरवा झेंडा दाखवला.

 या वेळी स्वयंसिदधा संस्थेतर्फे  इंधन बचतीबाबत पथनाट्यही सादर करण्यात आले. या रॅलीत ओएनजीसीचे अधिकारी, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, नागरिक, बचत गटातील महिला या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी इंधन बचतीची प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली.

जागतिक वातावरणात बदल झाले असून वाढत्या प्रदूषणाचा त्रास हा सर्वांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरात वाढलेल्या वाहनामुळेही निघत असलेल्या धुरामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे वातावरणावर परिणाम होत असून इंधनाचीही कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहनांचा वापर कमीत कमी करून चालणे गरजेचे आहे. त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन इंधन बचतही होणार आहे. याबाबतची जनजागृती नागरिकांना व्हावी यासाठी वॉकथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून रॅलीला सुरुवात झाली. रायगड बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मारुती नाका, समुद्र किनारा अशी रॅली काढण्यात आली. समुद्रकिनारी रॅलीचे विसर्जन झाले. या वेळी इंधन बचतीच्या घोषणा रॅलीत सहभागी झालेल्यांनी दिल्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply