स्व. लक्ष्मणशेठ पाटील आणि स्व. अविनाश म्हात्रे-पाटील यांच्या स्मरणार्थ नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप

आमदार प्रशांत ठाकूर, अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्व. लक्ष्मणशेठ पाटील आणि स्व. अविनाश म्हात्रे-पाटील यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 27) नावडे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नावडेे येथील जि. प. शाळेत सचिन लक्ष्मणशेठ पाटील व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नेत्रतपासणी, मोफत चष्मे वाटप तसेच अल्पदरात मोतीबिंदू शास्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यात 550हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली तसेच सुमारे 400पेक्षा जास्त नागरिकांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सचिन लक्ष्मणशेठ पाटील, नारायण जोमा म्हात्रे, विष्णू जोमा म्हात्रे, शैलेश लक्ष्मणशेठ म्हात्रे, संतोष विष्णू म्हात्रे, रमेश विष्णू म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, कुणाल अविनाश म्हात्रे, अनंता रामदास म्हात्रे, राजेश खानावाकर, प्रशांत म्हात्रे, पंकज म्हात्रे, धीरज म्हात्रे, अरुण गवळी, निलेश म्हात्रे, राजेश म्हात्रे, भालचंद्र खानावकर, मदन खानावकर, रवींद्र खानावकर, राम खानावकर, लक्ष्मण खानावकर, यशवंत ठाकूर, विनोद खानावकर, विशाल खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, लक्ष्मणशेठ पाटील यांनी समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे देता येईल याचा प्रयत्न सातत्याने केला. लक्ष्मणशेठ पाटील व अविनाश यांच्या निधनाने दुःखातून बाहेर येत त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांचे अनुकरण करीत समाजासाठी आपण काही केले पाहिजे या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. लक्ष्मणशेठ पाटील यांची समाजासाठी काम करण्याची जी तळमळ होती तीच त्यांची पुढील पिढी तितक्याच समर्थपणाने चालवेल, असा विश्वास व्यक्त केला.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply