बुशफायर क्रिकेट बॅश : पाँटिंगच्या संघाचा एका धावेने रोमहर्षक विजय

मेलबर्न : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात काही महिन्यांपूर्वी लागलेल्या वणव्यातून नव्याने उभारी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मदतनिधी प्रदर्शनीय सामन्यात रिकी पाँटिंगच्या संघाने गिलख्रिस्टच्या संघावर अवघ्या एका धावाने रोमहर्षक विजय मिळवला. पाँटिंग एकादशने 10 षटकांत विजयासाठी दिलेले 105 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात गिलख्रिस्ट एकादश फक्त एका धावेने कमी पडला.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाँटिंगच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाचा प्रशिक्षक जस्टीन लँगर अवघ्या 6 धावा काढून माघारी परतला. कोर्टनी वॉल्श यांनी लँगरचा त्रिफळा उडवला. यानंतर मॅथ्यू हेडन आणि कर्णधार पाँटिंग यांनी दुसर्‍या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. पाँटिंग दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर मधल्या फळीत ब्रायन लाराने फटकेबाजी करीत संघाला 10 षटकांत 104 धावांचा टप्पा गाठून दिला. गिलख्रिस्ट एकादशकडून गोलंदाजीत कोर्टनी वॉल्श, युवराज सिंह आणि अ‍ॅण्ड्र्यू सायमंड्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल गिलख्रिस्टच्या आपल्या डावाची सुरुवात अतिशय आक्रमक पद्धतीने केली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही खेळाडूंमध्ये 49 धावांची भागीदारी झाली. शेन वॉटसन दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर गिलख्रिस्टच्या संघाची मधली फळी कोलमडली. ब्रेट लीने ब्रॅड हॉज, युवराज सिंग यांना बाद करीत गिलख्रिस्टच्या संघाला धक्का दिला.

अखेरच्या फळीत अ‍ॅण्ड्र्यू सायमंड्सने फटकेबाजी करीत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडे पडले. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना गिलख्रिस्ट संघाच्या फलंदाजांना चारच धावा काढता आल्या. पाँटिंग एकादशकडून ब्रेट लीने दोन, तर ल्यूक हॉजने एक गडी बाद केला.

…अन् सचिन मैदानात उतरला!

मदतनिधी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील सदस्य एलिसे पेरीच्या विनंतीचा मान राखून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा बॅट हातात घेऊन मैदानात उतरला. इनिंग ब्रेकदरम्यान तेंडुलकर हा एलिसेच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करताना दिसला. या वेळी सचिनने पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावला.

‘पेरीने मला तू चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेकमध्ये एक षटक खेळशील का? या षटकातूनही आम्ही मदत उभारणार, अशी विनंती केली. मला संकल्पना आवडली. खांद्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी मला क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले, तरीही मी खेळेन. तुमच्या संकल्पनेतून आशा करतो की आपण पुरेसा निधी गोळा करू शकू’ असे म्हणत सचिन मैदानात उतरला.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply