मयांक, ऋषभला सूर गवसला

न्यूझीलंड एकादशविरुद्धचा सामना अनिर्णीत

हॅमिल्टन : वृत्तसंस्था
भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातील सराव सामना अनिर्णीत राहिला. दुसर्‍या डावात मयांक अग्रवालला गवसलेला सूर ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. शिवाय
ऋषभ पंतनेही अर्धशतकी खेळी करताना कसोटी संघात पुनरागमनासाठी दावा सांगितला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारापीसून सुरू होणार आहे.
पहिल्या डावात गोलंदाजांच्या जोरावर भारताने सामन्यात कमबॅक केले. दुसर्‍या डावात अग्रवालने 99 चेंडूंत 10 चौकार व 3 षटकारांनिशी 81 धावांची खेळी केली. पंतने 65 चेंडूंत 70 धावा कुटल्या. भारताने दुसर्‍या डावात 48 षटकांत 4 बाद 252 धावा करून 28 धावांची आघाडी घेतली. पंत आणि अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त पृथ्वी शॉ (39) यानेही बरी खेळी केली. रोहित शर्माच्या अनुपस्थितित कसोटी सामन्यात शॉला संधी मिळू शकते. ऋषभचा स्पर्धक वृद्धीमान साहाने नाबाद 30 धावा केल्या. न्यूझीलंड एकादश संघाचा कर्णधार डॅरील मिचेलने 33 धावांत तीन फलंदाज बाद केले.
तत्पूर्वी, पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (93) आणि हनुमा विहारी (101*) यांनी दमदार खेळ करताना संघाला 250 धावांचा पल्ला गाठून दिला होता. स्कॉट कुग्गेलईजन (4/30), जॅक गिब्सन (2/26) आणि इश सोढी (3/72) यांनी चांगली गोलंदाजी केली. भारताच्या पहिल्या डावाच्या 263 धावांचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराह (2/18), मोहम्मद शमी (2/48), उमेश यादव (2/49) आणि नवदीप सैनी (2/58) यांनी न्यूझीलंड एकादश संघाचा डाव 235 धावांत गुंडाळला.  
संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव सर्वबाद 263 (हनुमा विहारी 101*, चेतेश्वर पुजारा 93; स्कॉट कुग्गेलेईजन 3/40) आणि दुसरा डाव 4 बाद 252 (मयांक अग्रवाल 81*, ऋषभ पंत 70; डॅरील मिचेल 3/33) वि. न्यूझीलंड एकादश  पहिला डाव सर्वबाद 235 (हेन्री कूपर 40, राचीन रवींद्र 34; मोहम्मद शमी 3/17, जसप्रीत बुमराह 2/18); अनिर्णित

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply