Breaking News

रहिवासी सोसायटीच्या मीटर रूमला आग

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोलीतील शास्त्रीनगर येथील महालक्ष्मी रहिवासी सोसायटीच्या वीज मीटर पॅनल बोर्डला शॉर्टसर्किट होऊन रविवारी (दि. 16) दुपारी मोठी आग लागली. यात दोन दुचाकींसह संपूर्ण वीज मीटर पॅनल जळून मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, मेहबूब जमादार, जगदिश मरागजे, कल्पेश शहा, भक्ती साठेलकर व अन्य सदस्यांनी सोसायटी व शेजारील रहिवाशांच्या मदतीने आग विझविण्यासाठी मेहनत घेतली. दरम्यान, ही घटना वीज वितरण कंपनी खोपोली व अग्निशमन दल खोपोलीच्या कर्मचार्‍यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन विजेचा मुख्य पुरवठा बंद करून आवश्यक सर्व उपाययोजना केल्या व आग आटोक्यात आणली. यादरम्यान संपूर्ण वीज मीटर पॅनल, शेजारी उभी असलेली दोन दुचाकी वाहने जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मीटर पॅनल रूमची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती न झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वीज वितरणच्या कर्मचार्‍यांनी वर्तवला आहे.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …

Leave a Reply