Breaking News

ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार

शिवसेनेच्या जिल्हा संघटक, विभागप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार गणेश नाईक यांनी केले पक्षात स्वागत

नवी मुंबई : बातमीदार : ऐरोली विभागामध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून नवी मुंबई जिल्हा संघटक अ‍ॅड. संध्या सावंत आणि ऐरोली विभागप्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बुधवारी (दि. 19) आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

कोपरखैरणे येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या या कार्यक्रमास माजी आमदार संदीप नाईक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक दशरथ भगत, माजी नगरसेवक अशोक पाटील, परिवहन समितीचे सदस्य अ‍ॅड. जब्बार खान, दिनेश पारख, माजी नगरसेवक संपत शेवाळे, राजेश मढवी, निशांत भगत, विजय मिश्रा, सुदर्शन जिरगे, जयेश कोंडे आदी उपस्थित होते.

सर्व शिवसैनिकांचे भाजपमध्ये स्वागत करून आमदार गणेश नाईक यांनी त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासन देतानाच एकजुटीने भाजपसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. मागील वीस वर्षे नवी मुंबईकरांनी जो विश्वास दाखविलेला आहे आणि जे प्रेम आपल्यावर व्यक्त केले आहे, ते कायम राहील यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला.

आमदार नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया विभागप्रमुख सुकाळे यांनी दिली. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असल्याचे सांगून जिल्हा संघटक अ‍ॅड. सावंत यांनी शिवसेनेमध्ये न्याय मिळाला नसल्याची खंत बोलून दाखवली. भाजपचे विचार पटल्याने यापुढे आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जी जबाबदारी देण्यात येईल ती प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने मी व माझ्या कार्यकर्त्या यशस्वी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा संघटक सावंत आणि विभागप्रमुख सुकाळे या दोन प्रमुख शिवसेनेच्या नेत्यांसह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्याने ऐरोली विभागामध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये या विभागातून भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक जिंकून येतील याची मला खात्री आहे, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी व्यक्त केला.

प्रवेशकर्त्यांची नावे

ऐरोली प्रभाग क्रमांक 18 आणि ऐरोली प्रभाग क्रमांक 21 मधील पूनम सुकाळे,  बाळू शिंदे, राजेंद्र नवगने, धनराज सोनवणे, महादेव बोबडे, मोहन सोमवंशी, सुनंदा भोर, शितल शिंदे , करुणा दळवी, हेमा सालियन, लतिका निकम, अरुण वाडेकर, निलेश आमले, रेणू यादव, जसविंदर सोहेल, राजश्री सांगळे, सुभाष पाटील इत्यादींसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply