म्हसळा : प्रतिनिधी
गुटखा विक्री केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गुटका, सुगंधित तंबाखू असा एकूण चार हजार 528रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक डूस यांनी सांगितले. या प्रकरणी रामचंद्र मारोतराव भरकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसळा पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे आदेश आहेत. शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची तक्रार मुख्याध्यापक अगर शालेय व्यवस्थापन समितीने केली तर संबधीत टपर्यांवर कारवाई करण्यात येते.
-धनंजय पोरे, सहाय्यक निरीक्षक, म्हसळा पोलीस ठाणे