सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 5) उपांत्य फेरीच्या दोन लढती होणार आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यात भारत आणि इंग्लंड, तर दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका संघ आमनेसामने असणार आहेत.
अ गटात भारताने अव्वल स्थान पटकावले, तर ऑस्ट्रेलियाने दुसर्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. ब गटात द. आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने आफ्रिकेला या गटात अव्वल स्थान मिळाले, तर इंग्लंड दुसर्या स्थानी राहिला. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना होणार आहे, तर आफ्रिकेचा संघ यजमान ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्चला जागतिक महिला दिनी होणार आहे.
-उपांत्य फेेरीवर पावसाचे सावट उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यांवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे जर उपांत्य फेरीचे सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत प्रवेश करतील, कारण भारताने अ गटात आठ गुणांसह, तर आफ्रिकेने ब गटात सात गुणांसह अव्वल स्थान पटकाविले आहे.