कर्जत : बातमीदार : मंगल रमेश नायडू (वय 13) या मुलाला दहिवली येथून शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने अरुण कांबरी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या राखवालीतून पळवून नेल्याने कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. जी. देठे करीत आहे. मंगल नायडू याची उंची 141 सेंमी, रंग सावळा, डाव्या डोळ्याखाली तीळ, उजव्या हातावर इंग्रजीत एस असे अक्षर गोंदलेले, उजव्या हाताच्या मधल्या बोटावर तीळ, पाठीवर उजव्या बाजूला जुन्या जखमांचे व्रण, अंगात लाल चेक्सचा शर्ट व लाल रंगाची हाफपॅन्ट असे वर्णन आहे. या वर्णनाचा मुलगा कुठे आढळ्यास त्वरित कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …