पनवेल : बातमीदार : कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पनवेल परिसरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या कडेला बेघर असलेल्या भुकेल्या पोटासाठी पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी पुढाकार घेतला असून पनवेल परिसरातील बेघरांना अन्नदान केले.
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदी लागू केल्याने नागरिकांनी काल घरातच राहणे पसंत केले. मात्र जीवनाश्यक वस्तू व दुकाने वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर संचारबंदीमध्ये नागरिकांनी कामानिमिताने घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तू व वैद्यकीय कारणासाठी लोक बाहेर पडताना दिसत आहेत. हॉटेल, दुकाने बंद असल्याने परिसरातील असणार्या बेघर लोकांना जेवण आणि पाणी मिळणे कठीण झाले होते. यावेळी पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी माणुसकी दाखवत रेल्वेस्थानक, बस्थानाक, तसेच झोपडपट्टी आदी परिसरातील बेघरांना अन्नदान केले.