Breaking News

भूतिवलीतील मळा संचारबंदीत बनलाय सर्वांचा आधार

शेतकर्‍यांच्या शेतावर ग्राहकांची गर्दी

कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील भूतिवली येथील शेतकर्‍यांनी समूह शेती केली आहे. सहा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन भाजीपाल्याची शेती करीत आहेत. देशात आणि राज्यात आधी जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू केल्यानंतर भाजीपालादेखील शेतातून घाऊक बाजारपेठ गाठू शकत नाही, पण भूतिवली येथील शेतकर्‍यांच्या मळ्यावर आजूबाजूच्या 25 गावांतील लोक जाऊन ताजा भाजीपाला घेत आहेत. मळ्यावर हा भाजीपाला विकला जात आहे. त्याचवेळी त्यांच्याकडून एक टेम्पोतून आजूबाजूच्या गावांत ताजा भाजीपाला पोहचवला जात आहे. त्यामुळे सर्वांना या संचारबंदीमध्येदेखील ताजा भाजीपाला मिळत असल्याने तेही आनंदी आहेत.
पावसाळ्यानंतर प्रभाकर पवार, बाळाराम पवार, पुंडलिक कदम, दिनेश पाटेकर, चांदर झुगरे, बाळू मोरे यांनी एकत्र येत विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जमिनीची मशागत करून जास्त प्रमाणात भेंडी, त्यांनतर काकडी, टोमॅटो, वांगी, गवार, दुधी भोपळा, चवळी, मिरची, पालक, माठ, मुळा, झेंडू  अशा प्रकारची शेती केली. त्यासाठी पनवेल येथून आणलेली रोपे, बियाणे यांचा वापर केला. सुरुवातीला त्यांनी एक टेम्पो भाड्याने घेऊन दररोज पनवेलच्या बाजारात भाजीपाला नेण्यास सुरुवात केली. होलसेल बाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला देण्याचे काम हे शेतकरी करीत आहेत.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply